Friday, July 27, 2007

जिवतीची गोष्ट

आम्ही पुण्याला आल्यावर आईनी काही देवही बरोबर आणले. न सांगो, कदचित अनुग्रह होऊनही जाईल!

इतक्या दिवसांनी पोरग हाती लागल्यावर मग काय - श्रावण-बिवण आगदी यथोचित सुरु झाला. मला जास्त हौस खाण्याची, म्हणून मग पोट-भक्ति आलिच ओघनी...काय विचारु नका - डावाच्या चतुर्थीला रव्याचे लाडू, नाग पंचमीला मोदक, शिळसप्तमीला सांजणी आणि आळूच्या वड्या आणि वगैरे वगैरे. ही सवय आजीनी लावली - श्रावणी शनिवारी आळणी स्वयंपाक - मुगाच्या आणि तुरीच्या डाळी ची खिचडी, बाजरीचे रोटगे आणि माठाची भाजी, जन्माष्टमी ला भरलेली केळी.... मग जिवतीच वाण पण व्हायलाच पाहिजे, शुक्रवारी! कणिक आणि गूळ, जायफळ घालून केलेल्या आरत्या हे मुख्य आकर्षण, ओल्या नरळाचे कानवले आणि हरबऱ्याची ऊसळ पण आणि खजूऱ्या.

पुण्यात मात्र जिवतीच्या कागदावर आई खुश नव्हती...पण डोंबिवली मधली आजीच्या वेळची फ्रेम तुटायला आलेली. पुण्यात तो पॅटर्न मिळत नाही, डोंबिवलीतच मिळणार. मग या वेळी डोंबिवली मध्ये आठवण करून दिली, पाहिजे तसा फोटो घेण्याची. गद्रेच्या दुकानात जावून खास जिवतीचा कगद मागितला. पण तोच प्रकार. मग त्याला सांगितल, "आहो, ती एकच देवी असते ना, मुलं वगैरे बरोबर घेवून, तशी जिवती पाहिजे." मग त्याची ट्यूब पेटली - "हा, म्हणजे, सीकेप्यांची जिवती पाहिजे का?" मग त्यानी वरून कुठूनतरी तो ठसठशीत जिवती चा कागद काढला.

हिरवी नऊवारी साडी, भरपूर दागिने, एका हातात अमृताचा कलश, दुसऱ्या हातात पाळणा आणि त्यात एक मुल झोपलेले, पायाशी चार मुलगे आणि एक मुलगी असा भरगोस परिवार, सोबतीला वरच्या कोपऱ्यात चंद्र, सुर्य - अगदी लहानपणी बघितली होती तशीच.

मग लगेच कागदाची फ्रेम करायला टाकली. आता श्रावण कधी सुरु होतो त्याची वाट बघयची! कागदा वरच्या माहिती प्रमणे हा कागद १९३० पसून तसाच आहे, जरा सुद्धा बदल नाही. ह्यावर्षी नक्की आरत्या आणि खजूऱ्या चांगल्या लागणार!

टीप: तसा मी जात-पात मानत नाही, पण खाण्या पिण्या साठी कधी कधी होत अस. तसा मी देव पण मानत नाही, पण श्रीयुत गंगाधर टिपरे मधला शिऱ्या म्हणतो तस, मी नमस्कार करून, आईला, आबांना समधान मिळणार असेल, तर तस करूयात, त्यातलाच हा प्रकार.

1 comment:

Unknown said...

Hey,
Man - your Marathi is tough to read. I had to read it for almost 10 minutes to understand it. As you can guess - its been a while since I read Marathi :).

I was wondering if you had abandoned the blog for more than a month and a half..

Keep the good work up man.

Nitin