कुठे सण समारंभाला गेल की माझी नजर ऊगाच भिरी-भिरी फिरत असते. कुठे तरी साळकाया-माळकायांच्या घोळक्यात एखादी आजी दिसेल, मग त्यासगळ्या बयकांच्या प्युवर-सिल्कच्या सड्य़ांमध्ये तिची एकटीचीच ठेवणीतली, खास आजच्या समारंभासाठी काढलेली सुती नऊवारी साडी ऊठून दिसेल! हातावर, चेहऱ्यावर सुरकुत्या असतील, डोक्यावर अंबाडा, आजोबा हयात असतील तर कपळावर ठसठशीत कुंकू असेल...
पुर्वी मला वाटायच, बायका म्हाताऱ्या झाल्या की नऊवारी नेसतात. पुढे कधीतरी हा गैरसमज दूर झाला. संस्क्रुती-भाषा मरायला लागली यावर माझा विश्वास नाही, पण नऊवारी साड्या घालून, दसरा मिरवणूक, पाडवा मिरवणूक नी सहित्य दिंडीमध्ये सहभागी होणऱ्या बायकांपेक्षा किंवा म्रुणाल कुलकर्णीच्या रमाबाई पेशव्यांपेक्षा नऊवारी नेसावी तर एखाद्या आजीनेच!
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
You should visit my aaji. She has never worn anything other than nau vaari saadis.
-V
Yeah, both of my aaji's used to as well...and many other aaji who lived in our building. I miss it.
Post a Comment